राम दातीर माहूर (प्रतिनिधी )माहूर नगर पंचायत कडून शहरात सध्या सि.सी.रोडची मोठया प्रमाणात कामे करण्यात येत आहेत.वार्ड क्र.16 मधील ना...
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )माहूर नगर पंचायत कडून शहरात सध्या सि.सी.रोडची मोठया प्रमाणात कामे करण्यात येत आहेत.वार्ड क्र.16 मधील नागरीक
ज्योतिबा खडसे ते गफारभाई यांच्या घरा पर्यंत करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन दि.30 सप्टेंबर रोजी नगर सेविका श्रीमती सुधाताई दत्तराव कपाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
माहूर शहराच्या बहुतांश भागात सि.सी.रोडची कामे सुरू आहेत.त्याच अनुषंगाने वार्ड क्र.16 मध्ये केल्या जाणाऱ्या रोडची लांबी 57 मीटर व रुंदी 3-80 मीटर एवढी राहणार असून त्यावर 1027072 रूपये एवढा खर्च निर्धारित केला आहे.कामाच्या शुभारंभ प्रसंगी युवा सेनेचे तालुका प्रमुख विकास कपाटे, माजी उपनगराध्यक्ष मुनाफभाई, अशोक खडसे, आजिस भाई,मुस्साभाई,आनिल खडसे,आनिल जोगदंड,गफारभाई आदि मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS