धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोना वैश्विक महामारीच्या संक्रमणाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे.स्वःताच्या व परिवाराच्या आरोग्याची योग्य पध्दतीने काळजी घेणे हा एकमेव उपाय हा महामारीला हरवू शकतो हे हेरुन नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश पवार यांनी स्वयंफुरतीने व कर्तव्य भावनेने आयुष मंत्रालय पुरस्कृत आर्सेनिक 30 या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप संपूर्ण मतदारसंघात चालू केले असून त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्यावतीने संपूर्ण धर्माबाद शहरा मध्ये गोळ्या वाटपाचा मोहीम सुरुवात केलेली आहे. आज धर्माबाद नगरपालिका कार्यक्षेत्रात बाळापुर गावात वरील गोळ्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी उपस्थित कृषीउत्पन्न बाजारसमितीचे संचालक रमेशजी गौड, माजी नगरसेवक गंगाधर गौड, भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते सतीश मोटकुल, सजन गडोडजी , चेतन घाटे,विकी जंगीटवार , शेखर मनंतोड , योगेश , बाबू पाटील , गोविंद संबेटवार , पवन पत्रोड , अरविंद मोटकुल , साई जंगीटवार व सर्व गावकरी उपस्थित होते*
*नोट : या गोळ्यांचा मागणीच्या अनुषंगाने तुटवडा असल्या कारणाने गोळ्यांची आगावू मागणी करून या गोळ्यामागवाव्या लागतात. त्यामुळे ज्या नागरिकांना या पाहिजे असतील त्यांनी ऑनलाइन फॉर्म भरावा असे आवाहन सतीश मोटूकुल यांनी केले आहे!.
COMMENTS