*
_________________________
केज प्रतिनिधी_तालुक्यात अचानक आलेल्या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला पिकांचा घास अवकाळी पावसाने हिसकावून घेतला. सध्या सर्वत्र पिकांच्या काढण्याचे काम जोरात सुरू असताना परतीच्या पावसाने त्यामध्ये नुकसानीचा खो घातला . व झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे नुकसान झालेल्या पिकाचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50हजार नुकसान भरपाई देण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांच्या वतीने करण्यात तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तालुक्यात अचानक आलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकात पाणीच पाणी व ऊस भुईसपाट झाला आहे, त्याचबरोबर कापूस आणि बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे मोठ-मोठे झाडे कोलमडून रस्त्यात पडले आहेत म्हणून याकडे शासनाने तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी
COMMENTS