माहूर (प्रतिनिधी )जगावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे,बळीराजासह रेणुका भक्तांना सुखी समाधानी होऊ दे,जगात शांतता नांदू दे,देशाच्या रक्षण कर्त्याला उत्तम स्वास्थ्य लाभू दे व देश सर्वार्थाने संपन्न होऊ दे अशी याचना करून श्री रेणुका गडावर पहिल्या माळे पासून वे.शा.सं.रवि काण्णव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शतचंडी व चतुर्वेद पारायणाचे पठन सुरू केले आहे.
आज (दि.19 ऑक्टो.) तिसऱ्या माळेला प्रातःकाळी 5-30 वाजता विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी व चंद्रकांत रिठे यांनी मातेला नित्या प्रमाणे शेंदूर लेपन केल्या नंतर अभिषेक घातला.आज मातेला शुभ्र रंगाचे महावस्त्र चढविण्यात आले.आजचे तिचे रूप हे चंद्रघटेचे आहे. विश्वस्त संजय काण्णव,विनायक फांदाडे, अरविंद देव,दुर्गादास भोपी, आशीष जोशी व दुर्गादास भोपी यांनी छबीन्या सोबत फिरुन परिसर देवता पूजन केले. त्यानंतर मातेला महाप्रसाद चढविण्यात आला.
COMMENTS