माजलगाव/प्रतिनिधी
कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर आता अनलॉक प्रक्रियेत सर्व सुरळीत होत आहे. सोशल डिस्टनसिंगचे पालन करून नागरिक सर्व सुविधा काळजीपूर्वक वापरत आहेत. मात्र शहरातील बॅडमिंटन कोर्ट अद्याप सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी व्यायामाची प्राधान्याने अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी माजलगाव येथील बॅडमिंटन कोर्ट सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना शहरातील कोविड योद्धयांनी केली आहे.
शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील बॅडमिंटन कोर्टचा अनेक फिटनेससाठी जागरूक नागरिक लॉकडाऊन पूर्वी करत असत. आता अनलॉक प्रक्रियेत हे बॅडमिंटन कोर्ट सुरू होणे कोविड योद्ध्यांच्या फिटनेससाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते. येथे बॅडमिंटनचा सराव करणारे सर्वजण कोविड योद्धे आणि प्रतिष्ठित आहेत. ते सोशल डिस्टनसिंगसह इतर आवश्यक त्या सुरक्षेचे प्राधान्य पालन करतील यामुळे बॅडमिंटन कोर्ट सुरू करण्याची मागणी डॉ.प्रविण राठोड,डॉ.सुनिल गरड, डॉ.अजयसिंह डाके,डॉ.राहुल लड्डा,इंजि.गजेंद्र खोत,इंजि.चेतन चौधरी,इंजि.प्रताप इंगळे,अंकूश राठोड ,राहुल मुंडे, अशोक वाडेकर,रवी खुरपे ,अनिल कांबळे,भरत मिटकरी या कोरोना योद्धयांनी केली आहे.
COMMENTS