केसापुरी वसाहत येथील नागरिकांची मागणी
माजलगाव/प्रतिनिधी
शहरापासून तीन कि.मी अंतरावर 1976 पासूनच्या केसापुरी वसाहतीची शासनाने स्थापना केली असून येथील अर्जदार व इतर व्यावसायिकांना राहण्यास राष्ट्रीय महामार्ग क्र.61 लगतचे शासनाने संपादित केलेल्या जमिनीपैकी काही जागा येथील नागरिकांना भाडे तत्वावर दिली व त्याच जागेवर स्वखर्चाने पत्र्याचे शेड,घरे,पिण्याच्या पाण्यासाठी बोअर त्यावर विद्युत पंप बसवून याजागेवर व्यवसाय करुन उदरनिर्वाह मुला-बाळासह पोट भरत असलेल्या व्यावसायिकांना येथील उपसा सिंचन शाखा क्र.2 चे शाखा अधिकारी व्यंकटराव फड यांनी खोट्या नोटिस दिल्या असा आरोप करीत दि.17 ऑक्टोबर रोजी विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत.
तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.परंतु सदर आंदोलन स्थगित करण्यास येथील तहसीलदार वैशाली पाटील यांनी पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांना लेखी आदेश देवून सदर उपोषणकर्त्यास व नागरिकांना आंदोलनापासून परावृृत्त करण्यात यावं असा आदेश दिला आहेत.
दि. 9 ऑक्टोबर रोजी शासन संपादित जमिनीवर अतिक्रमण केल्याचे व ते अतिक्रमण 7 दिवसांत हटवण्याबाबत चूक व खोट्या नोटीस पाठवल्या त्या नोटिस मिळाल्यानंतर शाखा अधिकारी व्यंकटराव फड यांची येथील नागरिकांनी भेट घेवून आम्हाला खोट्या नोटिसा का ? पाठवल्या त्याबाबत विचारले असता त्यांनी आम्हाला अपमानास्पद बोलून आमचे घर पाडून टाकण्याची धमकी दिली. त्याच्या त्या कृृत्यामुळे आम्ही अर्जदार व आमच्या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.शाखा अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटिस रद्द करुन वापस घ्याव्यात,रहात असलेल्या जागेत भाडे रक्कम यापुढे करार प्रमाणे शासनाने स्वीकारून पावत्या देवून त्या नोटिस आधारे आमचे विरुद्ध यापुढील कोणतीही कार्यवाही करु नये,तसेच पूर्वी घेतलेल्या जागेच्या भाड्याच्या रक्क्मेच्या पावत्या न देणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यां-विरुद्ध तात्काळ चौकशी करुन त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी,खोट्या नोटीस देणाऱ्या व्यंकटराव फड यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्यात यावा या मागण्यांसाठी बेमुद्दत आमरण उपोषण केसापुरी वसाहतील नागरी बसले आहेत.
COMMENTS