धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे कोरोनाविरोधात जनआंदोलन करण्यात आले सोब...
धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे कोरोनाविरोधात जनआंदोलन करण्यात आले सोबतच कोरोनापासून संरक्षण प्रतिज्ञा घेण्यात आली
या प्रतिज्ञेचे वाचन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डाँ प्रतिभा येरेकार यांनी केेले.यावेळी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे,आपले हात वेळोवेळी स्वच्छ करणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ गव्हाणे सर व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ प्रतिभा येरेकार मॅडम व बालाजी श्रीगिरे उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वयंसेवक संतोष साखरे व कार्यक्रमअधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS