नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते मुन्ना (श्रीकांत) सुवर्णकार यांची समाजात चांगली पक्कड समाज कार्य बघून अन्याय ला छाती ठोक प्रतिउत्तर देणारे म्हणून यांची आठरा पगड जातीच्या मावळ्याची छावा संघटना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या नांदेड जिल्हाउपाध्यक्षपदी निवड नुकतीच करण्यात आली असुन छावा संघटनेचे संस्थापक धनंजय जाधव यांच्या हस्ते निवडीचे नियुक्तीपञ देण्यात आले.
पुणे, धानोरी येथे आठरा पगड जातीच्या मावळ्याची छावा संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत महाराष्ट्र राज्यातुन विविध जिल्हाचे संघटनेचे पद्धाधिकारी उपस्थित होते.या दरम्यान संघटन वाढीसाठी बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली असुन राज्यातील प्रत्येक जिल्हात छावा संघटनेचा प्रसार व संघटन मजबुत करण्यासाठी प्रत्येक जिल्हात कार्यकारणी करणार असल्याचे ठरविण्यात आले आहे.
या कार्यकारणी मध्ये नांदेड जिल्हातील मुक्रमाबाद येथील मुन्ना सुवर्णकार यांची सामाजिक कार्याची दखल घेत छावा संघटनेच्या नांदेड जिल्हाउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.यावेळी छावा संघटनेचे छावा संपर्क प्रमुख दादाराव बोबडे, छावा सह संपर्क प्रमुख विक्रम कदम, नांदेड जिल्हाध्यक्ष स्वपनील फुले,हिंगोली जिल्हा अध्यक्ष गजानन भोसले,उमेश पोतदार,सागर वानकर आदिची उपस्थिती होती.
त्यांच्या या निवडीबद्दल सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेशदादा पंदीलवार, सामाजिक कार्यकर्ते सुभाषअप्पा बोधने, RPI चे मुखेड तालुका अध्यक्ष माणिकराव गायकवाड, विजय खानापुरे, मुन्ना मुर्कीकर, प्रशांत मेटकर, रज्जाक कुरेशी, अशोक लोणीकर, जलील पठाण, शाकेर काझी, अब्दुल पटेल, मालिकार्जून खळुरे, आदिनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS