रामदास पाटलांच्या नेत्रदान संकल्पानंतर नेत्रदान चळवळीला मिळाली गती ...

    नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )   डोळे हे मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी असली तरी आघाताने किंवा आपघातामुळे ही देणगी सर्वांना मिळत नाही . ...


 


 नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)


 


डोळे हे मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी असली तरी आघाताने किंवा आपघातामुळे ही देणगी सर्वांना मिळत नाही . आघात किंवा आपघातामुळे दृष्टीहीन झालेल्यांना पुन्हा दृष्टी मिळण्याची किमया विज्ञानाने केली आहे . परंतु यासाठी गरज आहे . ती नेत्रदान करण्यासाठी पुढे येण्याची . या पवित्र कार्यासाठी हिंगोली येथील प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील यांनी पुढाकार घेत सपत्नीक नेत्रदानाचा संपकल्प केला . त्यांचा हा संकल्प अनेकांच्या विचारांना प्रकाश ठरला असून आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यात नेत्रदान करणाऱ्यांची संख्या झीरो होती . परंतु केवळ पाच ते सहा दिवसात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांची संख्या ४८५ वर पोहचली आहे . रामदास पाटील सुमठाणकर यांनी केलेला हा संकल्प चळवळीचे स्वरुप प्राप्त करत असल्याचे दिसून येत आहे . प्रशासकीय अधिकारी असतांनाही केवळ ' बोलबच्चन ' नव्हे तर कृती करणाऱ्यापैकी एक असलेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांनी दि . २८ सप्टेंबर रोजी दिव्यांगासाठी कार्यरत असलेल्या ' सक्षम ' या संघटनच्या माध्यमातून स्वतः आणि पत्नी वर्षा पाटील यांच्या नेत्रदानाचा संकल्प करत नोंदणी केली . रामदास पाटील सुमठाणकर यांनी नेत्रदानाची नोंदणी करुन सोशल मिडीयावर ' आपल्या मृत्युनंतर सुद्धा एखादा आपल्या डोळ्याने जग बघु शकेल तर मागे राहू नका , नेत्रदान करा आणि मृत्यूनंतरही सुंदर जग पहा ' असे भावनिक आवाहन केल्यानंतर त्यांच्या चाहत्या वर्गाने देखील नेत्रदानाचा संकल्प सोडला आहे . ' सक्षम'च्या संकेतस्थळावर दि . २८ सप्टेंबर पुर्वी नांदेड जिल्ह्यातील नेत्रदान नोंदणी झीरो होती . परंतु आजघडीला ती ४८५ वर पोहचली आहे . रामदास पाटील सुमठाणकर यांनी केलेल्या नेत्रदान संकल्पाला नेत्रदान चेळवळीचे स्वरुप आले असल्याचे दिसून येत आहे . एखाद्या अंध व्यक्तीचे जीवन प्रकाशमय करण्यासारखे कुठलेही कार्य नव्हे जगात नेत्रदान हे एकमेव असे पुण्यकर्म आहे ' मरावे परी नेत्ररुपी उरावे ' या भावनेने रामदास पाटील सुमठाणकर यांनी केलेला हा नेत्रदानाचा संकल्प अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group