महेंद्र पुरी, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली जिल्हायाचे तत्कालीन पोलिस अधिक्षक योगेश कुमार यांच्या बदली नंतर त्यांच्या जागेवर आयपीएस अधिकारी राकेश कलासागर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाची सुत्रे हातात घेतली आहेत.. त्यांनतर शहर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर कार्यरत रामेश्वर वैंजने यांची बदली झाल्याने व ग्रामीण उपाधिक्षक एजी खाँन हे सेवानिवृत्त झाल्याने दोन्ही पदे रिक्त होती. या जागेवर चंद्रपूर येथून आयपिएस सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख बदलीवर आले आसून देशमुख यांनी शहर व ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे. यतीश देशमुख हे तरूण आयपिएस अधिकारी असुन युपीएससी मधे महाराष्ट्रात 11 व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहेत. मुळचे नाशीक जिल्ह्यातील दिंडोरी येथील आहेत. जिल्हयाच्या ईतीहासात पहिल्यांदाच दोन आयपिएस अधिकारी हिंगोलीला मिळाल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तर अबाधीत राहणारच आहे त्याच बरोबर शहर व ग्रामीण भागातील अवैध धंदेचालकांचे चांगलेच धाबे दणानल्याचे दिसुन येत आहे..
COMMENTS