धर्माबाद (अहमद लड्डा) येथील हुतात्मा पानसरे हायस्कूल च्या उपमुख्याध्यापक पदी एस.के. बेंबरेकर यांची तर पर्यवेक्षक म्हणून मोहनराव पुलकंठवार यांची निवड करण्यात आली.
बेंबरेकर हे हु. पा. पतपेढी संस्थे चे अध्यक्ष असून त्यांनी शाळेसाठी 26 वर्षापासून योग्य ती कामगिरी केली आहे.
त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,लातूर येथे मॉडरेटर म्हणून ही कार्य केले.
पुलकुंठवार हे ही शाळेसाठी 24 वर्षापासून योग्य कामगिरी बजावली आहे. हे हु.पा.पतसंस्थेचे माजी सचिव म्हणून योगदान दिले आहे. तसेच जिल्हा शिक्षण मंडळ येथे ही मॉडरेटर चे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्रीनिवास रत्नालीकर ,अध्यक्ष रामचंद्र पाटील बंन्नळीकर, सचिव ऑड. विश्वनाथ पाटील बंन्नळीकर, सहसचिव सुरेश गंजेवार ,कोषाध्यक्ष रामचंद्र पाटील बाळापुरकर, मा.सचिव तथा संचालक गंगाधर जी गुजराथी डॉ. कमलकिशोर काकांणी व संचालक मंडळ अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक जी. एल. पवार गंगाधर नोरलावार, रामेश्वर गायकवाड, ज्येष्ठ शिक्षिका सौ.ना.ल. पडगलवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
COMMENTS