.
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )या शारदीय नवरात्रात
अष्टमी व नवमी एकत्र आल्याने रेणुका गडावर वैदिक मंत्रोच्चारात व षोडशोपचारात सहस्त्र नामावलीने कुंकुम अर्चन करून व पायसाचा नैवेद्य अर्पण केल्या नंतर श्री रेणुका मातेची आरती करण्यात आली.अष्टमी संपताच आज दि.24 ऑक्टो.रोजी सायं.6 वा.नवग्रहाची पूजा केल्यानंतर परिवार देवता,गणेश, वरूण व मातृका पूजन करून त्यांना आवाहन केल्यानंतर मंदिरा समोरील पारंपरिक हवन कुंडात होम हवन विधीस प्रारंभ करण्यात आला. औदुंबर,खैर,पिंपळ,वटवृक्ष व आखाडा या वृक्षाच्या समिधा होमकुंडात टाकल्या .त्यानंतर दहीभात व विविध प्रकारचे धान्य अर्पण करण्यात आले.संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर.जगताप,त्यांच्या धर्मपत्नी होम हवन विधीस बसल्या होत्या.या विधीचे पौरोहीत्य वेदपाठशाळेचे गुरुजी वे.शा.सं.निलेश केदार,रविंद्र काण्णव,संदीप काण्णव,अनिल काण्णव,मिलिंद काण्णव,मकरंद काण्णव,चंद्रकांत रिठे,शंतनू रिठे,मनोज बनसोडे,श्रीपाद जगत,संभाजी भोपी,दुर्गादास भोपी,चंडीकादास भोपी,भवानीदास भोपी,प्रशांत पाठक व दिनेश जोशी यांनी केले.आजाबबळी( कोहळयाचा )पूर्णाहुतीने यज्ञाची व नवरात्रीची समाप्ती करण्यात आली.
यावेळी संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय काण्णव,विनायक फांदाडे,बालाजी जगत,आशीष जोशी,राजे दुर्गादास भोपी,पुजारी विजय आमले यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.दस-याच्या मुहूर्तावर मुख्यध्वज उतरवून त्या पवित्र खांबास पंचामृताने स्नान घातल्या नंतर शेंदूर,हळद व कुंकू वाहून विधीवत पूजा केल्या नंतर नवीन वस्त्र चढविल्या जाते. त्यानंतर पालखी सजवून त्यात भार्गवरामाची (भगवान परशुराम ) मूर्ती ठेवून वाजता-गाजत व बोल भवानी कि,जय असा जयघोष करीत सिमोलंघन करण्यासाठी पालखी वरदाई देवीच्या पहाड़ावर जाते तिथे पर्णरुपि (आपट्याची पाने ) सोने लुटल्या नंतर पालखी परत मंदिरात आणून पर्णरूपी सोने मातेला चढविल्या नंतर दसरा महोत्सवाचीही सांगता होते.
COMMENTS