केज दि १५(प्रतिनिधी)
प्रत्येक मनुष्याचे आयुष्य घडविण्यात वाचनाची आवड हीच महत्त्वाचे कारण ठरले आहे. कारण वाचना शिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय महान कार्याची सिद्धता नाही. महापुरुषांकडे वाचन हेच सर्वश्रेष्ठ प्रेरणा शक्ती होती असे मत डॉ नागेश कराळे यांनी व्यक्त केले. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हनुमंत सौदागर होते. प्रा डॉ जे के जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ कराळे पुढे म्हणाले, वाचाल तर वाचाल हे म्हणून किंवा ऐकून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृतीत आणावे लागेल. युवक वाचन करतील तर देश वाचेल यावर डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा पुर्ण विश्वास होता. वाचनाची गोडी निर्माण व्हावी, महत्त्व समजावे यासाठीच आजचा वाचन प्रेरणा दिन आहे. प्राचार्य हनुमंत सौदागर म्हणाले की, वाचन ही एक संस्कृती आहे. या संस्कृतीचा वसा आणि वारसा आपण पुढे चालवला तरच उज्ज्वल भारताचे स्वप्न साकार होणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा अशोक घोडके, सुजीत नाईकवाडे अरविंद गायसमुद्रे, सतीश नेहरकर आदिंची उपस्थिती होती.
COMMENTS