माजलगांव/प्रतिनिधी
वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला बंदला जाहीर पाठींबा दिला आहे.तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न देखील करत आहेत. आ.अॅड.बाळासाहेब अांबेडकर यांनी दोन्ही राजेंचे नाव न घेता एका राजाला बिनडोक म्हटल्याची बातमी पेपर व माध्यमामध्ये छापुन आली आहे.नुकतेच सोशल मिडीयावर महेश जाधव रा.छत्रबोरगांव या माथेफिरुने अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना उद्देशुन अर्वाच्च भाषेत उल्लेख करुन दोन समाजात तेड निर्माण जातीविषयी फेसबुक व सोशल मिडीयाच्या अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लील कमेंट केली आहे.तसेच अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना सर्व समाज श्रद्धास्थान मानतो.तसेच महेश जाधव या व्यक्तिने अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांना उद्देशुन खालच्या पातळीवर जाऊन अश्लील कमेंट केल्यामुळे सर्व समाज बांधवाच्या भावना दुखावल्या आहेत.तसेच सामाजिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे अशा माथेफिरु महेश जाधव याचेवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गु.र.नं.२५०/२०२० कलम ५०५(२)अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.यावेळी भिमराव कदम सह सोनाजी घडसे,अरविंद मोरे इतर उपस्थित होते.
COMMENTS