धर्माबाद- (अहमद लड्डा) बंगू पुलावरील प्राणघातक खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत यासंदर्भात धर्माबाद मनसे तालुका अध्यक्ष श्री.दत्तात्रय कावडे ...
धर्माबाद- (अहमद लड्डा)
बंगू पुलावरील प्राणघातक खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत यासंदर्भात धर्माबाद मनसे तालुका अध्यक्ष श्री.दत्तात्रय कावडे यांनी शहरातील सा.बा. विभाग उपअभियंता यांना निवेदन सादर केले आहे. बन्नाली ते तानुर या मार्गावरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. समोरासमोरील वाहनांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. येत्या सात दिवसांत बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर "खड़े मारो" आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी, धर्माबाद तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दत्तात्रय कावडे यांच्यासह सचिव महादेव माळगे आणि मनसे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष शिवानंद ताटेलोट उपस्थित होते.
COMMENTS