====================================
हॉटेल्स आणि धाब्यावर धाडी
====================================
केज /प्रतिनिधी
केज पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात जोरदार कार्यवाही करीत बेकायदेशीररित्या दारूविक्री होत असलेले हॉटेल्स धाबे आणि हातभट्ट्या वर छापे टाकून मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेतले. केज पोलिसांनी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे आणि त्यांचे सहकारी अशोक नामदास, राजू गुंजाळ, वाहन चालक हनुमंत गायकवाड यांनी टाकळी फाटा येथील हॉटेल समर्थ, डोणगाव फाट्यावरील हॉटेल साई, कोरेगाव शिवारातील जयहिंद हॉटेल आणि मग मस्साजोग येथील हॉटेल विसावा या चार ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याची माहिती गुप्त खबर्यामार्फत मिळताच अचानक धाड टाकली. देशी दारू व टँगो पंच नावाच्या 47 बॉटल्स जप्त केल्या याची किंमत 1274 रुपये आहेत या प्रकरणी सतीश घुले, सुग्रीव घुले, सलमान शेख आणि बापू तुपारे यांना ताब्यात घेतले आहे. तसेच दुसऱ्या पथकाचे सहाय्यक फौजदार महादेव गुजर यांच्यासह त्यांचे सहकारी मंगेश भोले, अशोक नामदास, दिनकर पुरी रुक्मिणी पाचपिंडे व धनपाल लोखंडे यांनी पिसेगाव शिवारात आणि क्रांती नगर येथे हातभट्टी वर धाड टाकून 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी अचानक दारूविक्री विरोधात उचललेल्या कठोर पवित्र्यामुळे अवैद्य दारू विक्री आणि अवैध धंदे करणारे यांच्यात खळबळ उडाली असून दहशत निर्माण झाली आहे.
COMMENTS