उमरी:- संबंध महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असुन सकल मराठा समाजाने मोर्चाचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे व संभाजीराजे यांनी करावे असे मत व्यक्त केले परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असलेले प्रकाश आंबेडकर यांनी चक्क त्यांना बिनडोक असे संबोधले त्यांच्या या वक्तव्याने तमाम शिवभक्तांच्या वेदना दुखावल्या आहेत असे मत छावा युवा संघटनेचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले
आर्थिक रीत्या मागासलेला मराठा समाज हा शिक्षणामध्ये व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळू इच्छीत आहे यासाठी मराठा समाधान अनेक वर्षापासून लढा देत आहे परंतु आतापर्यंत यश आले नव्हते पण मागच्या फडणवीस सरकारने आरक्षणाची घोषणा केली परंतु महाविकासआघाडी सरकारला ते आरक्षण कोर्टात टिकवण्यास यश आले नाही यावरून सध्या सर्वत्र मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून सर्व मराठा समाजाचे नेतृत्व छत्रपती उदयनराजे व छत्रपती संभाजी राजे यांनी करावे हे असे सर्व संघटनांचे व समाजाचे मत आहे.....
यातच बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना बिनडोक असे संबोधले यामुळे तमाम शिवभक्तांच्या वेदना दुखावले गेले आहेत प्रकाश आंबेडकर हे वैचारिक असून सुज्ञ व जाणकार वकील सुद्धा आहेत त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती एका महापुरुषाच्या वंशजांनी दुसऱ्या महापुरुषांच्या वंशजांना बोलणे हे योग्य वाटत नाही समाजातील युवकांनी यावर काय आदर्श घ्यावा...? असे राजेश मोरे हे म्हणाले
COMMENTS