.
*केज प्रतिनिधी*
. केज शहरातील कळंब रोडवरील मुख्य रस्त्यावर नालीचे पाणी रस्त्यावरून वहात असुन वाहनधारकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असुन नगरपंचायत कार्यालयाने कार्यवाही करुन नालीची साफसफाई करुन रस्त्यावरील नालीचे पाणी बंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत . केज शहरातील कळंबरोडवर राष्ट्रीयकृत बँकां असुन कृषीउत्पन्न बाजारसमीती तसेच मोठी बाजारपेठ सुद्धा आहे.तसेच हा रस्ता पश्चिम महाराष्ट्राला जोडलेला असुन वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते.महत्त्वाच्या कामाकरीता नागरिकांना या रस्त्यावरून जावे लागते नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते . सध्या पावसाळ्याचे दिवस असुन रोगराई वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरीकांचे आरोग्य लक्षात घेत नगर पंचायतने नाली काढुन नागरीकांचे आरोग्य सांभाळावे अशी मागणी नागरीकांतुन होत आहे.
COMMENTS