नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
...................................
उत्तरप्रदेश मधील हाथरस बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्त नायगांव (बा.) येथील मुख्य चौकात दिनांक ५ रोजी सायंकाळी ६ वाजता विविध सामाजिक संघटनेच्या वतीने कैंडलमार्च काढून योगी सरकारच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला आहे .
उत्तरप्रदेश मधील हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी मनीषा वाल्मिकी हिच्यावर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची जीभ कापली, कमरेचा मणका तोडला आणि तिची हत्या करून उत्तरप्रदेश पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबातील नातेवाईकांना बंदिस्त करून मुलीचे प्रेत त्याच रात्री अडीच वाजता जाळले. पीडित मुलीचे कुटुंब अजूनही बिथरलेल्या अवस्थेत आहे, मुलीच्या न्यायासाठी आर्त हाक मारीत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे द्यावा, कुटुंबाला शासकीय मदत द्यावी, जलदगती कोर्टात हे प्रकरण चालवावे, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, व योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी अशी मागणी करीत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी फुले शाहू आंबेडकर आण्णा भाऊ चळवळीतील असंख्य कार्यकर्त्यांनी निषेध सभा गाजवली, सुरुवातीस लसाकमचे पदाधिकारी रवींद्र भालेराव यांनी मयत मनीषा वाल्मीक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले आहे. नगराध्यक्ष शरद भालेराव,आयोजक कैलास भालेराव, फकीरा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण भालेराव, प्रथम नगराध्यक्षाचे प्रतिनिधी पंढरी भालेराव. प्रकाशभाऊ हणमंते, पंङित वाघमारे. अ.भा. गुरु रविदास समता परीषदेचे गंगाधर गंगासागरे , प्रकाश कामळजकर, रंजीत देशमुख नरंगलकर , माणिक पा. चव्हाण , संजय पा.चव्हाण.भीमराव बैलके, माधव बैलकवाड, राजकुमार सोंनकाबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असुन यावेळी गंगाधर कोतेवार, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश बैलकवाड, कपिल डुमने, अविनाश गायकवाड, साहेबराव सूर्यकार, नामदेव गायकवाड, शंकर गायकवाड, पंढरी कोतेवार, खदीरसेठ बागवान , करीम चाऊस , बंटी नायगावकर , संतोष सुर्यवंशी , शेख आजमभाई , प्रदीप झुंजारे गंगाधर भालेराव आदीजन मोठ्या संखेने उपस्थीत होते .
COMMENTS