माजलगाव/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी मध्ये केसापुरी वसाहत येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत समृद्धी जाधव, यश राठोड, प्रज्ञा कांबळे, नंदिनी खिरे, अनुष्का गव्हाणे तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत स्नेहा पोटभरे, योगिराज भगस, विवेक सोनवणे, अविनाश नाईकनवरे हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना सिद्धार्थ ढवळे तर आठवीच्या विद्यार्थ्यांना शामला पाटील, उत्तम वाले, किशन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नवविकास मंडळाचे कार्यवाह मा.शिक्षक आमदार डी.के.देशमुख, अध्यक्ष ॲड.एस.आर.शर्मा, उपाध्यक्ष ॲड.एस.बी.मुळी, सहकार्यवाह ॲड.ए.एम.मोगरकर, शालेय समितीचे अध्यक्ष ॲड.आर.डी.भिलेगावकर, संचालक आर.बी.देशमुख, जी.एल.जोशी, मुख्याध्यापक अभिमन्यु इबिते, पर्यवेक्षक किशोर मोताळे यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केले.
COMMENTS