**
सोनपेठ/प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणास स्थगिती मिळाल्याने आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहे.यासाठी राज्य सरकारने सरकारची भूमिका योग्यरीत्या मांडणे गरजेचे आहे.मात्र सरकार ती मांडताना दिसत नाही.असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोनपेठचे तहसीलदार यांच्यामार्फत पोलीस भरतीस स्थगिती देण्याची मागणी केली आहे.सदर निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले.त्यानंतर तब्बल ३८ वर्ष लोटूनही आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजातील युवकांची परिस्थिती हलाखीची ठरली आहे.गावोगाव पोलीस भरतीसाठी मराठा समाजाचे तरुण तयारी करत आहेत.मात्र आरक्षण नसल्याने भरती होतील असे वाटत नाही.त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत सदर भरतीस स्थगिती देण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर शिवराज जोगदंड,अशोक भुसारे यांच्यासह युवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
COMMENTS