*
[ *दोन तरुणास* *कुंटूर* *पोलिसांनी केले अटक* ]
नायगाव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नांदेड - हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील पंचतारांकित कृष्णूर एम. आय. डी. सी. परिसरातील श्लोक इंडस्ट्रीज चे उद्योजक राहुल एकनाथ हत्ते वय ३५ वर्ष हे दिनांक ३ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री अंदाजे ८ : १५ वाजताच्या सुमारास एम.आय.डी.सी. परिसरात असलेल्या अब्बास धाब्यावर जेवण करून पायी-पायी त्यांच्या श्लोक इंडस्ट्रीज कडे जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी मोटार सायकल वरून पाठलाग करून चाकूचा धाक दाखवत त्याचे जवळ असलेला सॅमसंग गॅलेक्सी एम.-३१ - १८०० (अठरा हजार रुपये) किंमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले असल्याने श्लोक इंडस्ट्रीज चे उद्योजक राहुल एकनाथ हत्ते यांच्या फिर्यादीवरून कुंटूर पोलिसात सपोनि. करीमखांन पठाण यांच्या मार्गदर्शनाखालीं गुरंन १७०/२०२० कलम ३९२,३४ भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर प्रकरणातील गुन्हा दाखल होताच गुण्याचे तापसिक अंमलदार दिनेश येवले , *कुंटूर ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि करीम पठाण यांनी सदर गुन्ह्यांच्या तपासाची चक्रे फिरवली व सायबर सेल नांदेड यांच्या मदतीने गुन्ह्यातील दोन व्यक्तींनी केलेल्या गुन्ह्याचा सखोल असा अभ्यास करून सदरच्या गुन्ह्यातील त्या दोन व्यक्तीचा यांचा सापळा रचून शोध घेऊन त्या दोन मोबाईल चोरास ताब्यात घेऊन अटक करण्यात आले असून सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील बळजबरीने हिसकावून घेऊन गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.* सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम पठाण ,यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश येवले ,पोहेकॉ. एस.एम. कुमरे ,चालक पोना. सदाशिव पाटील ,पोना. साई सांगवीकर ,पोना.शेख अब्दुल बारी ,पोकॉ. अशोक घुमे ,पोकॉ. विवेक ईश्वरे यांनी यशस्वी पार पडली आहे.
COMMENTS