---------------------------
मादळमोही दि.१९ (संतोष भारती):- बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये परतीचा पाऊस जोरदार पडल्यामुळे शेतपिकांचे आतोनाक नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची पाहणी खासदार मा. छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा ओला दुष्काळ पाहणी दौरा दि.२० आँक्टोबर रोजी गेवराई तालुक्यातील गावात देणार भेटी आहे.
या वर्षीच्या झालेल्या परतीच्या पाऊसाने बीड जिल्ह्यासह गेवराई तालूक्यात अतिवृष्टी मोठा स्वरूपात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची सर्व शेतपिके मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली आहे. सोयाबीन यासह सर्व पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी खासदार मा. छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा ओला दुष्काळ पाहणी दौरा दि.२० आँक्टोबर २०२० रोजी गेवराई तालुक्यातील गावात देणार भेटी आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न, अडचणी, अनुदान, पिकविमा मंजूरी यासंदर्भात चर्चा होणार आहे. यामध्ये पाडळसिंगी मार्गे कुंभारवाडी ०९:३० - सावरगाव दहा वाजता
तर तांदळा येथे १० :३० नुकसानग्रस्त शेतातील पाहणी करणार आहे. तर कोळगांव येथे जय भगवान पेट्रोल पंप समोर बाबुराव तळेकर यांच्या शेतात जेवण व शेतकरी संवाद ११ ते १२:३० आहे. वडगाव ढोक येथे एक वाजता आहे.
त्यानंतर पांगरी मार्गे गोविंदवाडी ०२:००, तलवाडा शिवकालीन त्वरिता देवी ०२ :३०, आनंदवाडी ०३
-किनगाव-०३:३० आहे. तर गेवराई शहरातील तागडगांव रोड एनके काँम्पलेक्स येथील पूजा मोरे यांच्या कार्यालयाला चार वाजता भेट व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसोबत संवाद होणार आहे. संपर्कासाठी ८३७९८२८३७३, ९६०४४१९६५८, ९१३०१२६०६०, ९२८४४९१०६० यावर संपर्क साधावा.
मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, शेंगा, तुर, कापासाची फुटलेली बोंडे मातीमोल झाली. वांगे, टमाटे, इतर भाजीपाला जाग्यावर खराब झाला आहे.
COMMENTS