सोनपेठ/प्रतिनिध शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना म्हणून नामोल्लेख असणाऱ्या योगेश्वरी शुगर ई.लक...
सोनपेठ/प्रतिनिध
शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना म्हणून नामोल्लेख असणाऱ्या योगेश्वरी शुगर ई.लक्ष्मीनगर लिंबा या कारखान्याच्या १९व्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमाचे आयोजन १० ऑक्टोंबर रोजी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सकाळी ९:३०वाजता सामाजिक अंतर ठेवून करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमास शेतकरी,कामगार,कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर ॲड.रोहीत आर.देशमुख यांनी केले आहे.यात त्यांनी सदर कार्यक्रम अग्निहोत्री श्री यज्ञेश्वर रंगनाथ महाराज सेलूकर यांच्या हस्ते व जेष्ठ संचालक तथा माजी आमदार श्री.आर.टी.देशमुख प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या कार्यक्रमास ऊस उत्पादक,शेतकरी,ऊसतोड वाहतुक कंत्राटदार यांची उपस्थिती लाभणार आहे.
COMMENTS