------------ - -----------------------------------
मादळमोही दि,९ (संतोष भारती):- गेवराई तालुक्यातील अनेक गांवातुन राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो, पण पावसामुळे या महामार्गावर मोठ मोठी खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी तारे वरची कसरत करावी लागत आहे, विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी खड्डे चुकविताना आपघात होत आहे, अनेकाना दुखापती होत आहेत, तर अनेकांना नाहक प्राणही गमवावे लागले आहेत,या महामार्गावर वसुली साठी नाका आहे,पण महामार्गावरील खड्डया कडे संबधित ठेकेदारांनी दुर्लक्ष केले आहे,लवकरच सणासुदीचे दिवस आसल्याने वाहातुक वाढणार आहे, या सर्वच घटनेचा विचार करुन ठेकेदाराने तात्काळ महामार्ग खड्डे मुक्त करावा अशी मागणी होत आहे,
राष्ट्रीय महामार्ग २२२ वर खरवंडीच्या पुढे टोलनाका सुरु करुन टोलवसुली सुरु आहे,या टोल वसुलीतुन ठेकेदार लाखो रुपयांची कमई केली जात आसतांनाही महामार्गावर पडलेल्या खड्ड्या कडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे, हे खड्डे चुकविताना अनेक वाहनाचे आपघात होवुन गंभिर इज्जा होवुन अनेक जण दगावले आहेत, तरीपण संबंधित ठेकेदार काहीच उपाययोजना करत नसल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे,काही प्रमाणात खड्डे बुजविण्याचा केविलवाणी प्रयत्न केला जात आहे, खड्डे बजविले की पुन्हा तात्काळ त्या जागीच खड्डे होत आहेत,यामुळे महामार्ग अभियांता व ठेकेदाराची मिलीभगत समोर येत आहे,सणासुदीच्या काळात रहदारी वाढणार आसल्याने तात्काळ खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे,
बोगस काम करत खड्डे बुजविण्याचा उद्योग
-------------------------------------------------------
राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजविण्याचा फार्स दाखवला जात आसला तरी तो निव्वळ बनावटी आसल्याचे समोर आले आहे, निकृष्ट डांबरीकरण करुन बोगस काम सुरु आहे,सरकारी अभिंयाता यांना हाताशी धरुन लुटमार चालु आहे,
COMMENTS