*
*(कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने
तेथे राष्ट्रपती राजवट लागु करा )*
रिपब्लिकन सेनेच्या वतीने केज तहसीलदार यांना निवेदन सादर .
=======================================
केज ,(प्रतिनिधी)
ऊत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित युवतीवर चार नराधामांनी आतिशय अमानुषपणे आत्याचार करुन तिचावर बलात्कार केला तीची जिभ काढली,पाठीचा कणा मोडला सदर युवती ही बरेच दिवस मृत्युशी झुंज देत होती. अखेर ती मुत्यु मुखीपडली. तिचा जिवनातील संघर्ष संपला सदरील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असुन सदरचे प्रकरण हे उत्तर प्रदेश पोलिंसांनी गंभीरपणे घेतले नाही.सदर युवतीचा अंत्यदाहा सुध्दा तिचे आई वडील भाऊ इतर नातेवाईकांना न बोलवता मंध्यरात्रीच संबंधित पोलिसांनी करुन टाकाला.या वरुन असे दिसुन येते कि पोलिसांनी पुरावा नष्ट करण्याचे काम केले.या प्रकरणातील पोलिसांची वागणुकिवरुन पोलिस हे संबंधित आरोपीना पाठीशी घालत आहेत.व त्यांना मदत करत आहेत.त्यामुळे संबंधीत पोलीसांना तात्काळ बडतर्फ करून त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे.व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्याचप्रमाणे सदरील प्रकरण हे उत्तर प्रदेशात घडले असल्याने तेथील योगी सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे मा.राष्ट्रपती महोदयांनी हे सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी.जेने करुन पिडीत युवतीस योग्य न्याय मिळेल.अशा मांगण्यांचे निवेदन देण्याचा हा कार्यक्रम रिपब्लिकन सेना या पक्षाच्या वतीने ( बिड जिल्हाध्यक्ष ) मा.प्रा. बळीरामजी सोनवणे (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला .व केज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच सदरील निवेदन हे जिल्हाधिकारी बीड यांचे मार्फत महाराष्ट्राच्या राज्यपालांना व त्यांचे मार्फत मा.राष्ट्रपती महोदय यांना पाठवण्यात यावे. असे निवेदनात म्हटले आहे.या वेळी मा.बाबासाहेबजी अहिरे ( मराठवाडा माजी संघटक तथा जेष्ठ नेते),मा.दिनेशजी गायकवाड (जिल्हा ऊपाध्यक्ष बीड), मा.सय्यद रज्जाक (जिल्हा महासचिव बीड ), मा.गोपीनाथजी ईनकर (नाना) (केज ता.अध्यक्ष),मा.प्रकाश सोनवणे (ता.सचिव केज ) , मा.आश्रुबा तुपारे (ता.संघटक केज),मा.आण्णासाहेब घोडके (जेष्ठ नेते) व पक्षाचे ईतर कार्यकर्ते या वेळी ऊपस्थित होते.
COMMENTS