-----------
साईड पट्ट्या न भरल्याने संताप
-----------
तिन महिन्यापासून पूल ठेवला खोदुन
-----------
माजलगाव (प्रतिनिधी)मागील काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील पात्रुड ते जिवणापुर हा राज्य रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आला मात्र.काम पुर्ण होऊन चार महीने उलटले तरी संबंधित गुत्तेदाराने मात्र रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्या न भरल्याने अपघातास निमंत्रण मिळत आसल्याने परिसरातील ग्रामस्थांतुन तिव्र संताप व्यक्त होत आहे.तर पात्रुड येथील पुलदेखील तब्बल 3 महिन्यापासून खोदून ठेवल्याने वाहतूक खोळंबा होत आहे
सार्वजनिक बांधकाम माजलगाव उपविभाग अंतर्गत पात्रुड ते जिवणापुर या रस्त्यावर मध्यल्या रस्त्यावरून अंतर कमी पडते म्हणून परळी येथें जाण्यासाठी वापर केला जातो. या रस्त्यावर जवळपास २५ गावे आहेत या सर्वांचे दळणवळण तालुक्याच्या ठिकाणी व इतरत्र जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर होत असल्याने तो करण्यात यावा अशी कित्येक वर्षांपासूनची मागणी होती. त्यामुळे शासनाने या २५ किमी रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला.बीड येथील गुत्तेदाराने रस्त्याचे काम पुर्ण केले मात्र रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्ट्या कुठे भरल्या तर कुठे तशाच ठेवल्या काही ठिकाणी तर गावाजवळच साईड पट्ट्या भरल्या गेल्याचे दिसून येत आसुन या साईड पट्ट्या न भरल्याने अपघात होत आहेत. जर समोरून एखादे मोठे वाहन आले तर दुचाकीस्वार खाली पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.आता येत्या पंधरा दिवसांत साखर कारखान्याचे गाळप हंगाम सुरू होत आहेत, साखर कारखाने चालु झाल्यानंतर उसाचा भार असलेले ट्रॅक्टर, ट्रक ,बैलगाड्या रस्त्याच्या खाली उतरत नाहीत मग इतर वाहनांना त्यामुळे वाहतुकीस आडथळा निर्माण होत आहे.रस्ता होऊनही फक्त साईड पट्ट्या न भरल्याने अपघातास निमंत्रण मिळत आसल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी तिव्र संताप व्यक्त होत आहे.
--------
पात्रुड पुलाचे भिजत घोंगडे
याच रस्त्याच्या कामामध्येच पात्रुड येथील पूल बांधणीचा समावेश होता, स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते त्यास तिन महीने झाले फक्त संपूर्ण पुल खोदुन ठेवला आहे. पर्यायी कच्चा रस्ता केला मात्र त्या रस्त्यावरून पावसाळ्यात पाणी वाहत आसल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ होत आहे.इतके महिने उलटूनही पुलाचे कामच सुरू न केल्याने त्याचा जनतेला त्रास होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित गुत्तेदार यांना काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS