नांदेड. देि.4 ऑक्टोंबर.
शेतकऱ्यांनी शेतामध्ये उस,केळी, पपई,हरभरा,गहू व इतर पिकांची पेरणी करण्याअगोदर आपल्या जमिनीचे मातीचे परीक्षण करून पिकाची पेरणी करावी जेणेकरून जमिनीतील उपलब्ध घटकाची माहिती मिळून आपल्याला संबंधित पिकांना योग्य ते खताची मात्रा देता येईल व पिकाचं उत्पन्न वाढवता येईल यासाठी शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण अवश्य करावे असे आवाहन लिंगापुर ता. हदगाव येथील राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.
छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व कृषी विभागाच्या सहकार्याने लिंगापुर ता. हदगाव येथे माती परीक्षण केंद्राची स्थापना केली आहे,माती परीक्षण केंद्रमुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतील मातीची परीक्षण करणे सोयीचे झाले आहे, किनवट माहूर हदगाव हिमायतनगर भोकर अर्धापूर उमरखेड महागाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळचे एकमेव शासनमान्य माती परीक्षण केंद्र स्थापन झाले आहे, या परिसरात अगोदर कुठलीही माती परीक्षण केंद्राची सोय नव्हती, शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे मातीचे परीक्षण करून शेतामध्ये पिकाची लागवड करावी व आपली प्रगती साधावी असे आवाहन भागवत देवसरकर यांनी केले आहे
माती नमुने तपासण्यासाठी अत्याधुनिक अत्यावश्यक सुसज्ज व मशनरी सह प्रशिक्षित कर्मचारी असून शेतकऱ्यांना त्यांच्या मातीचा नमुन्याचा रिपोर्ट दोन दिवसात मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण केंद्राचे कर्मचारी महेश गोरेगावकर संदीप जाधव नंदू पाटील अनिल देवसरकर अमोल देवसरकर निरंजन देवसरकर यांच्या संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
COMMENTS