*सोलापूर – अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितिची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील-खंडापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्या बैठकीत महाराष्ट्रात समितीचे मजबूत संघटन करून त्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी समितीच्यावतीने नूतन प्रदेश कार्यकारिणी निवडण्यात आली.*
*या बैठकीत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितिच्या – महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल गोयल यांची निवड केल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील-खंडापूरकर यांनी जाहीर केले. तसे निवडीचे पत्र संघटक बाळासाहेब फाळके यांच्या हस्ते राहुल गोयल यांना देण्यात आले. यावेळी बोलताना राहुल गोयल यांनी समितिचे कार्य सर्वदूर पोहचविण्यासाठी व विशेष करून पीडित वर्गांच्या न्याय हक्कासाठी काम करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले आणि संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.*
*वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकांतून छायाचित्रासह प्रसिद्ध करावी, हि विनंती.*
*राहुल गोयल.*
*9822582777*
COMMENTS