*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नायगाव तालुकाध्यक्ष पदी व्यंकट पा.शिंदे यांची निवड.*
नायगांव प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नायगाव तालुकाध्यक्ष पदी व्यंकट पा. शिंदे यांची निवड केली.सदर निवडीचे नियुक्तिपत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे विलास पा.धुप्पेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष व्यंकट शिंदे यांनी या पदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या,व अडीअडचणी सोडवून पक्षवाढीसाठी काम करू असे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर यानी व्यंकट शिंदे यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
COMMENTS