धर्माबाद (अहमद लड्डा) शेतकऱ्यांच्या हिताच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री दत्तात्रय कावड़े यांनी पाठपुरावा करत सी सी आय कडून कापूस खरेदी केन्द्रासाठी मुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवले होते. श्री कावड़े यांच्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री यांनी ह्या विषयी सी सी आय कडून धर्माबाद च्यां कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करण्याच्या सूचना सम्बधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावडे यांच्या वतीने 2020-21 साठी मागील आठवड्यात सी.सी.आय खरेदी केंद्र सुरु करण्याचे निवेदन भारतीय कापुस निगम लिमीटेड महाप्रबंधक, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते
यांच्या निवेदनाची दखल घेत धर्माबाद येथे सी सी आय केंद्र चालु करण्यासाठी टेंडर रिलीज करण्यात आले आहे. ह्यामुळे श्री दत्तात्रय कावडे ने प्रशासनाचे आभार मानले आहे.
दत्तात्रय कावडे यांनी शेतकर्यांच्या आत्मीयतेपोटी दिलेल्या निवेदनाला यश आल्यामुळे शेतकर्यांनकडुन आनंद व्यक्त केला जात असून सर्व धर्माबाद तालुक्यात श्री दत्तात्रय कावड़े यांचे सर्व स्तरातुन कौतूक होत आहे.धर्माबाद तालुका मनसे अध्यक्ष श्री कावड़े यांच्या प्रयत्ना मुळे हे टेंडर धर्माबाद सहित किनवट, वसमतनगर, चोपड़ा आणि वड़वनी साठी रिलीज झाले. आहे. सदरील प्रयत्नामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश आले आहे,असे मनसे अध्यक्ष श्री कावड़े यांनी आमच्या वार्ताहरांशी बोलताना सांगितले आहे.
COMMENTS