धर्माबाद येथील सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी जब्बारोद्दीन यांचे निधन


 


धर्माबाद (प्रतिनिधी) शहरातील उर्दू शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी जब्बारोद्दीन सर वय ६८ वर्ष यांचे उपचारा दरम्यान ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी रात्री निधन झाल्यामुळे धर्माबाद तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


धर्माबाद तालुक्यातील मुस्लिम धर्मातील मुला,मुलींना शिक्षण घेता यावे, यासाठी सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी जब्बारोद्दीन यांनी शहरातील काही जुन्या लोकांच्या मदतीने धर्माबाद शहरात उर्दु शाळेची स्थापना केली आहे.सदरील शाळेत पहिली ते दहावी पर्यत उत्तम शिक्षण मिळत असल्यामुळे तालुक्यातील पालकवर्गानी समाधान व्यक्त केले होते.त्यांनतर त्यांनी मुस्लिम मुला, मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शहरात जुन्नीयर महाविद्यालयाची शासनाकडून मंजूरी आणून अकरावी व बारावीचे शिक्षण मुस्लिम मुला, मुलींना उपलब्ध करून दिले आहे.यासह त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून मुस्लिम मुला व मुलींना शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले होते. तसेच सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी जब्बारोद्दीन हे हिंगोली जि.परीषद मध्ये कार्यरत असताना सेवानिवृत्त झाले होते. त्यांची प्रकृती गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अस्वस्थ वाटत असल्यामुळे नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता.परंतु तेथील डाॅक्टरांनी पुढील उपचारासाठी हैदराबाद येथील रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता.त्यामुळे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी जब्बारोद्दीन यांना हैदराबाद येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांची प्रणाज्योत मावळली.त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले,एक मुलगी व नातु, नातवंडे असा मोठा परिवार आहे.रविवारी सकाळी अकरा वाजता शहरातील मुस्लिम स्मशानभूमीत त्यांची अंत्यविधी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष जावेदभाई यांचे ते वडील होत.यांच्या निधनाने धर्माबाद तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


टिप्पण्या