=============================
नायगांव प्रतिनिधी.( रामप्रसाद चन्नावार )
................................................ केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्याच्या विरोधात असून शेतकऱ्यांच्या मागणीला विरोध दर्शवित असुन व देशभरात विविध ठिकाणी अत्याचार वाढत असल्याने उद्या नायगांव तहसील कार्यालयावर कष्टकरी संघटनेचा मोर्चा धडकणार आहे.
दिनांक 22 ऑक्टोंबर 2020 रोजी दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान कष्टकरी संघटनेचा विविध मागण्या संदर्भात मोर्चा निघणार असून सदर मोर्चामध्ये किमान सविस्तर निवेदन उपस्थित करणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्वकार आईलवार यांनी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे सोशल डिंस्टिंगचे तंतोतंत पालन करीत हा मोर्चा दुपारी तहसील कार्यालयावर निघणार असून यामध्ये कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सुशक्षित तरुण बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कष्टकरी संघटनेचे सचिव कॉम्रेड देवराव आईलवार यांनी केले आहे.
COMMENTS