* धर्माबाद ( अहमद लड्डा ) कोरोनाची महामारी आल्यापासून गोरगरीब मजूर बँन्ड वाध्यकाम करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे किमान सहा ते सा...
*
धर्माबाद ( अहमद लड्डा ) कोरोनाची महामारी आल्यापासून गोरगरीब मजूर बँन्ड वाध्यकाम करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे किमान सहा ते सात महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे बँन्ड व्यवसाय ठप्प पडला आहे त्यामुळे बँन्ड वाजवण्याचे काम करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आज दिनांक ०१/१०/२०२०रोजी धर्माबाद येथील तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री यांना 50.000 हजारा रुपयाचा अनुदान प्रत्येकी एक माणसांना देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.यावेळी सयाजी वासनीकर,मोगलाजी वासनीकर, गंगाधर वासनिकर , माधव वासनिकर, विजय हातागळे, सायबू वासनिकर, लीगुराम, श्रीकांत सोनकाबळे, सतीष वासनिकर ,चंद्रकांत मेडेवार, मरीबा निदानकर, पोशष्टी,राहूल धावणे, प्रदीप वासनिकर, विलास डाकोरे हे उपस्थित होते.
COMMENTS