राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )संत रविदास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या अराजकीय-सामाजिक संघटनेच्या माहूर तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार अॅड.नितेश बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक कार्याच्या माध्यमांतून सातत्याने समाज बांधवांना मदत करणे,त्यांच्या सुखदुःखात धाऊन जाणे,सर्वांना विश्वासात घेवून समाजहीत साधणे,कठीण प्रसंगी समाज प्रबोधन करणे आदि कार्याची दखल घेवून संत रोहिदास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक तुळशीराम वाघमारे, प्रभारी अध्यक्ष तुकाराम सोनटक्के,मार्गदर्शक तथा महिला प्रदेशाध्यक्ष सुनीताताई नेटके यांनी अॅड.बनसोड यांची माहूर तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे माजी जि.प.उपाध्यक्ष तथा विद्यमान जि.प.सदस्य, समाधान जाधव, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे, कॉंग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकीने, मराठा सेवा संघाचे भाऊसाहेब नेटके,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिगंबर जगताप, विखे पाटील कृषी परिषदेचे ज्ञानेश्वर चौधरी, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील. पंचायत समितीचे गटसमन्वयक संजय कांबळे, गोरसेनेचे तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव,ज्ञानेश्वर पवार, गणेश चव्हाण, जितेश जाधव आदीनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.अनेक सामाजिक संघटनेच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
COMMENTS