..आष्टी(दादासाहेब बन)
आज दि.30 सप्टेंबर रोजी माझे पप्पा श्री दत्तात्रय माधवराव कुलकर्णी( आरोग्य सहाय्यक,प्रा. आ.केंद्र सुलेमान देवला)सेवानिवृत्त होत आहेत.तरी या सेवानिवृत्ती निमित्त मी सौ.रेणुका हेमंत सिंधगावकर(मुलगी)त्यांचा जीवनपट थोडक्यात मांडणार आहे.
पप्पाचा जन्म 14 सप्टेंबर 1962 रोजी गरीब कुटूंबात झाला.गरीबी म्हणजे खाण्याचीही भ्रांत.चार घर माधुकरी मागून खाणे हा रोजचा नित्यक्रम. नवसा_ सायसाने झालेल आणि तीन बहिणींच्या पाठीवर झालेल हे शेंडेफल लहानपणापासूनच लाडक.......हालाखीच्या परिस्थितीतZ.P.Boys High School Ashti मधे शिक्षण सुरू झाल पण त्यांना शालेचे कपडे मिलत नसत.इतर मुलांप्रमाणे डबा नसायचा. शालेचे पुस्तक नसायचे आणि गरीब परिस्थितीमुले कुणी मित्र जवल करत नसत. तेव्हा लाईट नव्हती, कंदिल चिमणी लावून अभ्यास करावा म्हणल तर घरात राँकेलही नसायच.
पण म्हणतात ना मैत्री असावी तर श्रीकृष्ण आणि सुदाम्या सारखी.त्यांचे मित्र श्री सुनिलजी अपसिंगेकर(श्रीकृष्ण)घरची परिस्थिती चांगली. त्यांनी पप्पाला अभ्यासाला लागणारी पुस्तके तर दिलीच पण ते वाचण्यासाठी घराचे दरवाजेही खुले केली. या कामी त्यांच्या आईचे खूप सहकार्य झाले.एवढयातूनही नशीब वाईट म्हणून की काय दहावीत पप्पा नापास झाले.पुढे मग आभ्यास करुन आणि लिमटाक्याच्या गणपतीच्या आशिर्वादाने पप्पा पास झाले.
दहावी पासवर पप्पा एरिगेशन ला रोड कारकून म्हणून लागले.अवघ्या तीनशे रू.पगारावर. मग 1989 ला लग्न झाल आणि नंतर मग माझा जन्म झाला.स्वतःच छोटस घरही झाल.मग माझी लहान बहिण अर्चनाचा जन्म झाला.पण नियतीला हे सुख जास्त दिवस मान्य नव्हत.याच कालात त्यांच्या चालू नोकरीवर गदा आली,म्हणजे त्यांना कामावरून कमी करण्यात आल.पण ते हारले नाहीत संघटनेमार्फत त्यांनी त्यांचा लढा चालू ठेवला. आम्हाला त्याची काहीही कल्पना येवू दिली नाही.त्याही आबोल पप्पांच रूप मी अनुभवलेल आहे.
काही दिवसांनी सन 2000 ला आरोग्य विभागात त्यांच समायोजन झाल.त्यामुळे आमची परिस्थिती थोडी बरी झाली.मग आमचे शिक्षण त्यात त्यांचा सतत आग्रह असायचा मी कमी शिकलो पण माझ्या मुलींना मी खूप शिक्षण देणार आणि त्यांनी ते पार पाडल.मला आजही हलवे ,मायालु आणि प्रेमल पप्पा आठवतात.सतत दुसर्यांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव.मला पहिल्यांदा लेडिज हाँस्टेल नगर येथे सोडवून परत येताना ढसढसा रडलेले पप्पा मी अनुभवले आहेय.ते सारखे म्हणतात, माझी ताई,माझी ताई.तर मोनीला हेवा वाटतो पण अस काही नाही ग तुझ्यावरही त्यांचा तितकाच जीव आहे आणि कालजी पण तेवढीच करतात.
आणि सगल्यात महत्वाच म्हणजे त्यांच्या या 32 वर्षांच्या संसारात पप्पांच्या सतत पाठिशी असणारी माझी आई.अतिशय शांत स्वभाव.जीवनात कितीही चढ उतारा आले तरी ती खचली नाही.तीन वेलेस पप्पांचा अपघात झाला.ते तीनही वेलेस मरणाच्या दारातून परत आले ते आईच पुणय असल्यामुळे. पण आईने त्यांचे गुणदोष सगल स्वीकारून खंबीर साथ देत राहिली. आज तिला खर्या अर्थाने निस्वार्थी अरधांगिणी म्हणावे लागेल.
या सेवानिवृत्ती निमित एवढच सांगावस वाटत ,पप्पा तुम्हीं दोघ एकटे नाहीत.तुमच्यासोबत दोन लेकी दोन जावाई आहेत. आपण जगात पाहतो, मुलगा आसणारे तरी किती आई वडिलांना संभालतात.पैशासाठी मुले किती भांडणे करतात. दोन्ही जावाई तुमच्या मनासारखे मिलाले हे ही तुमच्या दोघांच्या सत्कर्मांची पावती आहे.दोन्ही जावाई तुमच्यावर मुलांसारखच प्रेम करतात.आम्ही दोघीही आमच्या घरी सुखात आहोत.या सेवानिवृत्ती निमित एकच मागण असच आम्हाला आई पप्पांच प्रेम मिलोआणि तुम्हा दोघांना निरोगी दिर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना........
तुमची ताई,
सौ.रेणुका हेमंत सिंधगावकर
लातूर.
COMMENTS