. नायगांव ( प्रतिनिधी )
भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतकरी जगला तर देश जगेल या प्रमाणे शेतक-यांना अल्प दरात कर्ज मिळाले पाहिजे या साठी शासकीय स्तरावर राज्य सरकारने संबंधिताना कडक सूचना दिल्याने या वर्षात भारतीय स्टेट बँक नायगांव शाखेच्यावतीने नव्य आणि जुने 23 गावातील 2163 शेतक-यांना 16 कोटी 9 लाख रूपयाचे कर्ज एक दोन महीन्यात वाटप केल्याचे शाखा व्यवस्थापक सिद्धार्थ कांबळे यांनी सांगीतले आहे. शेतक-यांना कमी वेळात कर्ज उपलब्धतेमुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त केले जात आहे.
सजा सजी बॅकतील कर्मचा-याना शेतकरी कर्ज म्हटल की कपाळावर गाटया यायच्या पण सध्या परिस्थिती बदल्यांच चित्र दिसत आहे . नायगांव शहरातील भारतीय स्टेट बँक नायगांव शाखेच्यावतीने अनेक योजना राबवून शेतकरी ,बेरोजगार , व्यापारी , बचतगट आदिना वेगवेगळ्या योजने अंतर्गत कर्ज उपलब्धत करून देत स्वलंबी बनवण्याचा प्रयत्न अनेक वेळा करण्यात आला आहे . ठाकरे सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करून शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाल्याने शेतकरी सावकाराच्या संकटातुन मुक्त होत आहे .
नायगांव तालुक्यातील 23 गावे भारतीय स्टेट बँक नायगांव या शाखेला दतक आहेत. या वर्षी 1644 शेतक-यांचे 11 कोटी 19 लाख पिक कर्ज माफ झाले आहे तर तेवढेच पिक कर्ज शेतक-यांना वाटप करण्यात आले आहे. तर नविन 519 शेतक-यांना 4 कोटी 90 लाख रूपये नविन कर्ज देण्यात आले त्याचबरोबर जि.एस.एल.कोविड ऐ.सी.मी कर्ज 50 लक्ष वाटप झाले आहे .कोरोना च्या काळात तही बॅकेचे कर्मचारी शेतकरी , कामगार ,व्यापारी, विद्यार्थ्यी यांच्या कामाना प्रथम प्राधाने देत आपले कर्तव्य पार पाडत आहेत .दोन महीन्यात पारदर्शक पणे शेतकरी पिक कर्ज प्रक्रिया पार पाडत अगदी कमी वेळात कर्ज उपलब्धतेमुळे शेतकरी मात्र बॅंकेच्या कारभारा बाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
COMMENTS