माजलगाव (प्रतिनिधी) मनूर (देवीचे) येथील ह्या वर्षी कोविड१९ मूळे संपूर्ण राज्यात नवराञ उत्सव कम प्रमाणात होणार असून, भाविक भक्त तूरळीक प्रमाणात व सोशल डिटेंस पाळुन दर्शन घेणार आहेत. त्यातच माजलगाव तालूक्यातील पंचक्रोशीत नावाजलेली देवी म्हणून मनूर येथील रेणूका माता देवी मंदिर हे प्रसिद्ध असून त्याच ठिकाणी माजलगावच्या हाकेच्या अंतरावर हे मनूर गाव असुन तिथेच संतोषी माता मंदिर हे पण असून त्या मंदिरा समोर खूप मोठ्या अडचणी असून ताथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही,मूबलक स्वच्छता नाही,व्यवस्थीत लाईट नाही, तसेच रस्ताच्या साईड ला झाडेझूडपे वाढली आहेत.अचानक अपघात सूद्धा होऊ शकतो.अरुंद पूल आहे .बर्याच भाविकांचे व तेथील रहिवाशांचे छोटे मोठे त्या ठिकाणी अपघात होतात.या संपूर्ण समस्या बाबत मनूर येथील ग्रामसेवक व सरपंच यांना आॅनलाईन निवेदन देउन ही कसलीच कार्यवाही करत नाहीत. मूळात ज्या ठिकाणी संतोषी माता मंदिर आहे त्या ठिकाणि रहदारी व वर्दळीचे ठिकाण आहे.तेथेच ५ फूटाचा अरूंद पूल आहे व समोरच माजलगाव ,गोविंदपूर रस्ता असल्या मूळे झाडेझूडपे असल्यामूळे थेट समोरा समोर गाड्याची टक्कर सूद्धा होते.यात कधि काळी जिवित हानी सूद्धा होऊ शकते,कारण की संतोषी माता मंदिरा कडे जाण्यासाठी १५ फूट रस्ता आहे परंतू पूल अरूंद आहे.तो तात्काळ वाढवून देण्यात यावा व मंदिरा समोर मोठा हायमस्ट अथवा तिन ते चार एल.इ.डि,बल्ब ,झाडेझूडपे काढण्यात यावी अशा आशयाचे सरपंच व ग्रामसेवक यांना वेळोवेळी विनंती वजा अर्ज करून सूद्धा जाणून बूजून दखल घेत नाहीत .म्हणून गटविकासअधिकारी पंचायत समिती माजलगांव यांना सूध्दा या समस्ये बाबद निवेदन दिलेले आहे.२०आॅक्टोबर पर्यत वरिल सर्व कामे केली नाही तर विविध स्वरूपाचे अंदोलने करण्यात येतील असा इशारा अशोक ढगे,मूस्ताक कूरेशी,अमोल ढगे,भारत वाघमारे,अलिशेर,लक्ष्मण कांबळे,कैलास ढगे,मस्के व इतर दिलेल्या प्रसिद्धी पञकान्वे दिला आहे.
COMMENTS