"शेकापने" दिला मुख्यमंत्र्यांना ईशारा
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
निसर्गाच्या अवकृपेने दुबार व तिबार पेरणी करून चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने तोंडात जाणाऱ्या घासाला हिसकावून घेतले.आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नांदेड जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ अनुदान द्यावे अन्यथा "शेकापच्या" वतीने तीव्र आंदोलन छेडून नांदेड - हैदराबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा चिटणीस भाई सय्यद ईस्माईल नरसीकर यांनी नायगांवच्या तहसीलदारांमार्फत राज्याच्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
बोगस बियाणे मुळे पीक उगवले नसल्याने खरिपाच्या पेरणीपासूनच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जिल्ह्यात कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी करावी लागली.पेरणीसाठी पैसे व्याजाच्या रूपाने कर्ज काढून ञस्त झालेल्या शेतकर्यांवर पुन्हा परतीच्या पावसाने तर कहरच केला.हाताला आलेले उभे पीक जमीनदोस्त होऊन त्याची नासाडी झाली.वारंवार आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना प्रत्येकी हेक्टर 50 हजार रुपये अनुदान द्यावे,कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लाॅकडाऊन पासूनचे घरगुती वीजबिल माफ करण्यात यावे,पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांची कामे त्वरित चालू करण्यात यावे, मुस्लिम बांधवांना पाच टक्के आरक्षण देऊन ते अंमलात आणावे व ग्रामीण भागात चालू केलेल्या महिला गटांना विविध फायनान्सने कर्जपुरवठा केला आहे.त्या कर्जाच्या हप्त्यासाठी सवलत देऊन लाॅकडाऊन काळातील कर्जाचे व्याज माफ करण्यात यावे अशी मागणीही शेकापच्या वतीने निवेदनाव्दारे नायगांवच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
शेकापच्या या मागण्या शेतकरी व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीचे असल्यामुळे शासनाने त्वरित मान्य करावे अन्यथा तिव्र अंदोलन छेडून नांदेड - राज्यमहामार्गावर चक्काजाम अंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेकापचे जिल्हा चिटणीस भाई सय्यद ईस्माईल नरसीकर,तालुका अध्यक्ष शेख मैनोद्दीन, भाई लक्ष्मण चिवळीकर,बालाजी सुर्यवंशी,शेख आयुब,ईब्राहीम तंबोली,केशव सुर्यवंशी,शेख पाशा औराळकर,आनंदा पवार,शेख सत्तार,शेख मगदूम यांनी दिला आहे.
COMMENTS