, 66 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
तत्कालीन पोलीस अधीक्षक योगेश कुमार , अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१९-२०२० मध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्याबाबत गुप्त बातमी काढुन त्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्षामार्फत अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती यामुळे ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बंद असल्याचा बनाव करणारे ठाणेदार यांचे पितळ उघडे पडले होते.
चिंचोलकर यांच्या कारवाई ने अनेक प्रकारचे मोठे मोठे रॅकेट समोर आले होते
ज्यात आर्म Act,फसवणूक/अत्यावश्यक वस्तू अधिनियम ,भारतीय स्फोटक कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदा, महाराष्ट्र जुगार कायदा, बनावट भारतीय चलनी नोटा,गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मन व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा,बेवारस मोटरसायकल, अवैधपणे वास्तव्यास ठेवलेले प्रवासी अशा सर्वच बेकायदेशीर व अवैध प्रकरणासंबंधी पथकाने वीशेष कारवाई केली
या विशेष कारवाईत एकूण ९२ आरोपीविरुद्ध संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळय़ा पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल केले व सदर गुन्ह्यांमध्ये एकूण ६६लाख ८३हजार ४१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता
ATS पथकाच्या वरील विशेष कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रभारी अधिकारी ओमकांत चिंचोळकर,पोका रुपेश धाबे, महेश बंडे, अर्जुन पडघन,चापोकाॅ विजय घुगे यांना प्रशस्तीपत्रक व बक्षीस देऊन गौरव केला होता.
COMMENTS