नांदेड,प्रतिनिधी
दिनांक 9 ऑक्टोंबर
नांदेड जिल्ह्याला कृषी विभागाकडून रब्बी हंगाम सन 2020-21 बीजोत्पादन कार्यक्रमकरिता हरबरा बियाणे पिक प्रात्यक्षिक 1560 हेक्टर, प्रमाणित बियाणे 3165 हेक्टर, तर प्रमाणित बियाणे दहा वर्षावरील 1231 हेक्टर इतका लक्षांक मंजूर झाला आहे, जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस मुबलक पडल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हरबरा पेरणीसाठी जास्त आहे,यामुळे अनुदानित हरबरा बियाणांचा लक्षांक नांदेड जिल्ह्यास दुप्पटीने वाढवून देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असल्यामुळे दरवर्षीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला शेतकऱ्यांची खरिपाचे पीक हाताची गेली आहे,जमिनीत ओलावा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा पेरणीकडे जास्त कल आहे, जिल्ह्यात हरभरा पेरणी या वर्षी वाढणार आहे,त्यामुळे शासनाने अनुदानवरील हरभरा बियाण्याचे वाटप करून खरीप हंगामात आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने तातडीने करावं, जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामसाठी हरभरा पिकांच लक्षांक देण्यात आलेल्या पेक्षा दुप्पट करावा सध्याचा लक्षांक खूपच कमी व अपुरा असल्याने अनेक शेतकरी अनुदानित बियानापासून वंचित राहतील.यासाठी कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री आशोकराव चव्हाण यांनी अनुदानित हरबरा बियानाचा लक्षांक वाढवून देण्याबाबत विचार करून तात्काळ कृषी विभागाला आदेशीत करावे, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा जिल्ह्यातील एकही शेतकरी अनुदानित हरभऱ्या बियाण्यापासून वंचित राहू नये अशी यावेळी मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.
COMMENTS