====================
*केज ! प्रतिनिधी
सध्या अहमदपूर-मांजरसुमबा महामार्गाचे केज शहर अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना कंपनीने कामातील सातत्य व कामाचा दर्जा खालावत असल्याची तक्रार केज विकास संघर्ष समितीने केज तहसीलदार यांच्यासह एच पी एम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली असून संबधित कामाचा दर्जा व सातत्य यात सुधारणा न केल्यास तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
केज शहर अंतर्गत कामात सातत्याचा अभाव दिसत असून कानडी चौक व उमरी रस्त्याचा तोंडावर कंपनीने नवीन पाईपलाईन व केबल टाकण्यासाठी कच्चे खोदकाम करून अर्धवट सोडले आहे.
या दोन्ही रस्त्याच्या तोंडाशी तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित करावा तसेच केज शहर अंतर्गत काम सुरू असताना पुरेशा प्रमाणात व वेळोवेळी रस्त्यावर पाणी मारण्यात यावे अशी मागणीही समितीने केली आहे. वरील मागण्यांवर तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास मंगळवारी रास्ता रोको करण्याचा इशाराही केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले व नासेर मुंडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
COMMENTS