,
केज प्रतिनिधी.
नेकनूर पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे नाव बालाघाट वर खूप चर्चित आहे .कारण जून महिन्यापासून बालाघाट जवळ असलेल्या डोंगर रांगावर वृक्ष लागवड करून बीज रोपण करून खाकी वर्दीतील वृक्षप्रेमी पाहावयास मिळाले जवळपास पन्नास हजार बीज रोपण तसेच हजारो वृक्ष लागवड करून एक आगळावेगळा समाजा समोर आदर्श ठेवणारे पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होत आहे. सुरुवातीला त्यांनी वृक्ष लागवडीचे आव्हान केले त्यांच्यासोबत पत्रकार व इतर नागरिकांनी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने वृक्ष लागवड करून नैसर्गिक समतोल राखण्यासाठी मदत केलेली आहे. प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी अशी संकल्पना आपल्या देशांमध्ये आहे कारण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष खूप महत्त्वाची मानली जातात त्यामुळे या गोष्टीची दखल घेत मनात संकल्पना तयार करून पोलीस सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी सर्व टीम च्या मदतीने आगळावेगळा उपक्रम राबवला याची दखल घेत धर्मवीर प्रतिष्ठान व पत्रकार मंच नांदुर घाट च्या वतीने धर्मवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत डीसले व पत्रकार श्रीकांत जाधव यांच्या वतीने नेकनूर पोलीस स्टेशन येथे सत्काराचे आयोजन केले होते .यावेळी उपस्थित एपीआय विलास जाधव. पत्रकार मनोज गव्हाणे. अशोक शिंदे .सुरेश रोकडे व पोलीस चौकी येथील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते,
COMMENTS