10 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या बंद संदर्भात चर्चा विचारविनिमय आणि समाज बांधवांचे मत जाणून घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापुर शहर जिल्ह्याच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली यावेळी 9 ऑक्टोंबर रोजी तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरासमोर होणाऱ्या जागरण गोंधळ आंदोलनात जाण्यासाठी ठराव मंजूर झाला यासह छत्रपती उदयनराजे महाराज भोसले आणि खासदार युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्यासमवेत चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा ही ठराव मंजूर झाला या बैठकी विषयी अधिक माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दिलीप कोल्हे आणि प्रताप चव्हाण यांनी दिली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शहर जिल्हा मुख्य समन्वयक दास शेळके सुनील रसाळे संजय शिंदे योगेश पवार राम गायकवाड पोपट भोसले मनोज शिंदे शेखर फंड अक्षय बचुटे, शैलेंद्र पाटील, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते
COMMENTS