केज प्रतिनिधी
केज येथे रिडींग न घेताच बिल मारले नागरिकांच्या माथी .
लॉक डाउन मध्ये अव्वाच्या सव्वा दिलेली बिले ग्राहकांची डोकेदुखी ठरल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांचा उद्रेक झालेला दिसून आला.मात्र त्यात दुरुस्ती न करता उलट मागच्या दोन महिन्यातही केज शहरात महावितरणच्या बिलिंग गुत्तेदाराने उंटावरून शेळ्या राखत मीटर रिडींग न घेताच वारेमाप बिले ग्राहकांच्या माथी मारले आहेत.
मार्च पासून ते जून पर्यंत सर्व लोक घरात असल्याने वीज वापर वाढल्याचे हास्यास्पद कारण देत रिडींग न घेताच गुत्तेदाराने शेकड्यात येणाऱ्या ग्राहकांना हजारोची बिले देऊन कोरोना काळात चांगलाच शॉक दिला. सदरील प्रकरणी मनसे च्या वतीने ठीक ठिकाणी तोडफोड करून निषेध देखील व्यक्त केला आहे.बैठका झाल्या, ऊर्जा मंत्र्यांनी अजब वक्तव्य केली, एकरकमी बिल भरल्यानंतर सूट देण्याचे अमिष दाखवले. मात्र यापैकी एकही निर्णय मूर्त स्वरूप घेऊ शकला नाही. ग्राहकांनी कशीबशी हफत्याने बिले भरण्यास सुरुवातही केली. अन याचाच गैरफायदा घेत गुत्तेदाराने जुलै,ऑगस्ट महिन्यातही रिडींग न घेताच केज तालुक्यात मागच्या प्रमाणेच मनमानी बिले देऊन पुन्हा एकदा ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे.
दरम्यान रिडींग घेण्यासाठी कर्मचारी न आल्याने कांही ग्राहकांनी स्वतः मोबाईल द्वारे रिडींग सबमिट केली. मात्र सदरील रिडींग ग्राह्य न धरता मनमानी रक्कम टाकून बिले वाटप केली आहेत. ज्यांना हजाराच्या आत बिले येतात अश्या ग्राहकांनाही हजारोच्या आकड्यात बिले दिली असून मागचेच बिल भरायचे राहिले असल्याने पुन्हा हे नवीनच संकट समोर उभे राहिले आहे.
रिडींग प्रमाणे बिल देण्याच्या सूचना संबंधित कंपनीला द्याव्यात अश्या मागणीचे पत्र मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस व केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार यांनी केज तहसीलदार यांना दिले आहे.
---------------------------------------
दरम्यान लॉक डाउन उठल्यानंतर वास्तविक पाहता प्रत्यक्ष रिडींग घेऊन बिले देणे अपेक्षित होते. मात्र हैद्राबाद च्या कंपनीकडे असलेल्या गुत्तेदार टीमने एका जागी बसूनच अंदाजे बिले ग्राहकांच्या माथी मारले आहेत, रिडींग प्रमाणे बिल घ्या अन्यथा बिलिंग कंपनीला परिणाम भोगावे लागतील अशा ईशारा मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी दिला आहे.
--------------------------------------------
COMMENTS