*केज प्रतिनिधी*
पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोण सायकलवरुन तर कोण चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस यंदापासून 'वृत्तपत्र विक्रेता दिन'म्हणून साजरा होत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा आमच्या कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस असल्याच्या भावना आहेत. वृत्तपत्र विक्रेत्याला समाजात सन्मान मिळावा अशी अपेक्षा
वृत्तपत्र विक्रेता हा घटक दुर्लक्षित आहे. त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. काहीजण वृत्तपत्र विक्रेत्यांचा 'एकेरी'उल्लेख करतात. तर काहीजण आदरही करतात. प्रामाणिकपणाने काम करणारा हा वर्ग आहे. या घटकाकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी.
वृत्तपत्र विक्रेता ते देशाचे राष्ट्रपती हा डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्मदिवस हा 'वृत्तपत्र विक्रेता दिन'म्हणून साजरा होतो. हा वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सन्मानाचा दिवस आहे. त्यांनाही समाजात सन्मान लाभावा अशी अपेक्षा आहे.
वृत्तपत्र विक्रेता नसेल तर वृत्तपत्राला शून्य किंमत आहे किंवा वार्ताहराला सुद्धा शून्य किंमत आहे वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये देशांमध्ये काय घटना घडल्या आहेत हे वाचण्यासाठी वृत्तपत्र विक्रेता याची फार गरज आहे शासनाने या वर्गाकडे दुर्लक्ष केलेले आहे वृत्तपत्र विक्रेत्याला विमा संरक्षण तसेच पत्रकारांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती वृत्तपत्र विक्रेत्यांना सुद्धा दिल्या पाहिजेत एसटी प्रवास असो किंवा त्यांच्या मानधनाचा प्रश्न असो याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे वृत्तपत्र विक्री त्याला वर्षातुन मोजून चार ते पाच दिवस सुट्टी असतील असा एकमेव समाजात चोवीस तास काम करणारा वर्ग आहे काही माणसे अनेक ठिकाणी पैसा बेमाप खर्च करतील पण पेपरचा हिशोब मात्र काटेकोरपणे करतात
बाकी काही असो या विक्रेत्यांना रात्री कितीही वाजता झोपो पहाटे ऊठावेच लागते सलाम करतो त्यांच्या कार्याला
🙏🙏🙏🙏🙏
संपादक
सतीश व्यंकटराव केजकर
COMMENTS