धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 2020 ते 2021 हे चालू शैक्षणिक वर्ष अद्यापही प्रत्यक्ष अध्यापन-अध्ययन करिता सुरू झाले नाही. त्यामुळे जुलै 2020 ला इयत्ता पहिली ते बारावीच्या निर्धारित अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली. सद्य परिस्थितीचा विचार केला तर त्यात अभ्यासक्रमात 50 टक्के कपात करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा जनसेवा प्रतिष्ठान संस्थापक नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री व शिक्षण राज्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा विचार करुन जर दिवाळी नंतर शाळा सुरू झाल्या तर उर्वरित 75 टक्के अभ्यासक्रम मिळणाऱ्या कार्यदिनात पूर्ण होणार नाही. शिवाय दहावी आणि बारावी दोन्ही बोर्डाच्या परिक्षेआधी प्रात्यक्षिक परीक्षा किमान 20 ते 25 दिवस चालतात. त्यामुळे किमान या दोन वर्गाच्या अभ्यासक्रमाचा आणि मिळणाऱ्या वेळेचा विचार करता अभ्यासक्रम 50 टक्के कमी करुन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी प्रा.दारमोड यांनी केली आहे.
COMMENTS