माजलगाव/प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका खेड्यात दलित समाजातील मनिषा वाल्मिकी वर उच्च वर्णीयातील काही गुंडांनी सामुहिक बलात्कार करून तीची हत्या केल्या प्रकरणात आरोपींचा खटला फास्ट ट्रँक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांना 1 आक्टोंबर गुरुवार रोजी निवेदनात केली आहे.
मनीषा वाल्मिकी ही मुलगी तीच्या शेतात जनावरे चारण्यासाठी गेली असताना दुष्टहेतूने पाळत ठेवून बसलेल्या नराधमांनी तीच्यावर सामुहिक बलात्कार केला आणि अमानुष पणे तीची हाडे मोडून जीभ कापली व गळादाबुन जीवे मारण्याचे कृत्य केले. यासर्व दुषकृत्याचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून निषेध व्यक्त करुन या प्रकरणातील सर्व आरोपीं विरोधात सक्षम गुन्हे दाखल करून तो खटला फास्टट्रँक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्हा अध्यक्ष नानासाहेब घोडके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किसन गायकवाड, जिल्हा संर्पक प्रमुख रमेश जगताप, युवा जिल्हा अध्यक्ष राजेश जाधव, अँड. दत्ता जाधव, राधाकिसन भाळशंकर, बंडू सोनवणे, सुभाष कांबळे, अश्विन खंडागळे, विजय नरहीर, बालासाहेब गवळी यांच्या सह उपस्थित होते.
COMMENTS