,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
दिंद्रुड दि ( प्रतिनिधी )
बीड जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे, शेतकऱ्याचा खरीप हंगाम 100% वाया गेला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सत्ताधारी कुठे गेले? असं वाटत असताना, जिल्ह्याच्या खासदार मात्र संसदेचे अधिवेशन संपताच थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्या. खरीप पिकाच्या नुकसानीची पाहणी केली .एवढेच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांचे दुःख ओळखा ,आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी ,अशा प्रकारची मागणी सरकारकडे केली आहे.
मागच्या पंधरा दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे अतोनात नुकसान झालं .सोयाबीन, कापूस ही पिके शंभर टक्के वाया गेले आहेत. अद्याप पर्यंत पंचनामे सुरू झालेले नाहीत. जिल्ह्यातील सत्ताधारी एकही शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले नाहीत. मात्र खासदार डॉ. प्रीतम ताई मुंडे संसदेचे अधिवेशन संपताच त्यांनी आज माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. दिंद्रुड येथील गजानन महाजन या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सोयाबीन व कापुस पिकाची झालेल्या नासाडीची पाहणी केली. यासंदर्भात बोलताना खासदार प्रितमताई म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात खरीप पिकाचे नुकसान झाल असून सोयाबीन कापूस तूर यासारखी पिके हाती लागत नाहीत. कोरणा संकटात हे संकट फार मोठ असून शेतकऱ्यांचे दुःख आता सरकारने ओळखावं. आणि कुठल्याही परिस्थितीत हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधून त्यांना दिलासा दिला. या दौऱ्यात भाजपा नेते रमेश आडसकर सह सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
COMMENTS