बीडजिल्हाअध्यक्ष अॅड.अमोल डोंगरे यांची मागणी
माजलगाव प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हवालदिल झाले-ल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने कंबरडे मोडले असून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने शासनाने जायमोक्यावर शेतकऱ्या -च्या शेतात जावुन पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष अॅड.संदीप ताजने यांच्या आदेशानुसार बीड जिल्हाअध्यक्ष अॅड.अमोल डोंगरे यांनी येथील तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे दि.5 सोमवार रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
त्यासोबतच माजलगाव तालुक्यातील देवळा खुर्द येथील गायरान धारक 1978 पासून आजतागायत गट नं.5 व 6 मध्ये सातत्याने पीक पेरा घेत आलेले असून याच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करित असून मागील सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लागवड केलेल्या कापूस,सोयाबीन,बाजरी,तूर, मुग व तीळ या पिकांचे नुकसान झाले असून अतिवृष्टीने या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले असून गायराना शिवाय अन्य जगण्याचे साधन नसल्यामुळे गायरान धारक शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन पीक पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजार रुपयांची तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी बहुजन समाज पार्टीचे बीडजिल्हाअध्यक्ष अॅड.अमोल डोंगरे,चंदनलाल बनगे जिल्हा सचिव बीड,अरविंद लोंढे विधानास अध्यक्ष माजलगाव,जालिंदर साळवे, राजाराम किर्ते,हनुमान आवाड,रावण किर्ते, अंकुश किर्ते,सुभाष किर्ते,दगडू किर्ते,लिंबाजी दुगाने यांच्या सह अन्य गायरान धारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
COMMENTS